लातूर चे माजी लोकप्रिय खासदार संसदरत्न प्रोफेसर डॉ ॲड सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रीन लातूर वृक्ष टीम ने लातूर च्या शासकीय महिला तंत्र निकेतन च्या परिसरात आज ६०० वृक्षा चे रोपण करण्यात आले. वृक्षाचे रोपण करण्यासाठी शेकडो विद्यार्थिनी आणि ग्रीन लातूर वृक्ष टीम चे डॉ पवन लड्डा आणि टिम नी आणि शासकीय महिला तंत्र निकेतन च्या स्टाफ नी वृक्ष लागवड केली.
या प्रसंगी माजी खासदार डॉ सुनील वत्सला बळीराम यांनी मागोत व्यक्त करताना ग्रीन लातूर वृक्ष टीम आणि डॉ पवन लड्डा यांचे कौतुक केले आणि लातूर शहर आणि जिल्हा येथे लाखो वृक्ष लागवड केल्या बद्दल कौतुक करुन भारत. सरकार नक्कीच याची दखल घेईल आणि टीम चा गौरव करतील अशा शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त करुन डॉ गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags
सांगली प्रतिनिधी