इमारतीच्या पार्किंगला ही मालमत्ता कर लावण्याबाबत महासभेत जो ठराव केला आहे तो रद्द करा - आनंद लेंगरे

 

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये पार्किंगची अवस्था ही बऱ्याच वर्षापासून बिकट असून रस्त्यावरच वाहने लावण्याची पद्धत खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ज्यांनी पार्किंग व्यवस्था केली आहे, त्यांना बक्षीस देण्याऐवजी त्यांच्यावरच कर लावणे म्हणजे हा त्यांच्यावर अन्याय करण्यासारखेच होईल. ज्या इमारतीं अथवा व्यवसायिक इमारती आहेत ज्यांनी पार्किंगची सोय केली नाही अशा इमारतींना पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत आदेश अथवा सूचना देण्याचे गरजेचे असून पार्किंग व्यवस्था असणाऱ्या इमारतीला कर लावणे हे कोणत्या तत्त्वात बसते. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे होईल. महापालिकेचे उत्पन्न वाढणे गरजेचे असून पण अशा पद्धतीने उत्पन्न वाढविणे संयुक्तिक होणार नाही. बांधकाम परवाना घेताना पार्किंगची सोय केलेली दिसते. पण इमारत पूर्ण झाल्यानंतर पार्किंगची सोय त्या ठिकाणी नसते अथवा पार्किंगसाठी ठेवलेला एरिया हा कमी केलेला असतो याच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तरी ज्यांनी पार्किंगची व्यवस्था केली आहे त्यांच्यावर कर न लावता त्यांची प्रशंसा करणे गरजेचे आहे. त्यांना लावलेल्या पार्किंग कराला आमचा पूर्ण विरोध राहील. कराची अंमलबजावणी केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे आव्हाहन मदन भाऊ पाटील युवा मंच  अध्यक्ष आनंद लेंगरे यांच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post