सांगली दि. 8 (जनसंपर्क विभाग) : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून शुभम गुप्ता (भा.प्र.से.) आज दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी रूजू झाले. त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून पदभार स्वीकारला.
आज महापालिकेच्या कार्यालयात उपस्थित राहून मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी कामकाज सुरू केले आहे. नागरिकांकडून पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके स्वीकारून ती मनपा शाळेमध्ये देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व चंद्रकांत खोसे, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर व संजीव ओहाळ यांच्यासह मनपा कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्थित
होते.
Tags
सांगली प्रतिनिधी