राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहरजिल्हा पदाधिकारी यांनी घेतली शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट

सांगली प्रतिनिधी 
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत हे सध्या सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत

याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहरजिल्ह्याच्या पदाधिकारी यांनी खा.संजय राऊत यांची भेट घेतली 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की राज्यामध्ये सध्या होणार असलेल्या लोकसभा निवडणुकिला महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे 

त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते खा.संजय राऊत हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत , त्यांचे आमच्या महाविकास आघाडीच्या घटक असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने स्वागत करण्यासाठी आमच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांची आज भेट घेतले ,तसेच आघाडी धर्म आम्ही पाळणार असल्याचे ही ते म्हणाले

यावेळी युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुल पवार ,सागर घोडके, हरिदास पाटील ,अभिजित हारगे , तानाजी गडदे, छाया जाधव , धनपाल खोत ,उत्तम कांबळे, आयुब बारगिर, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे,उमर गवंडी ,विजय माळी, आकाराम कोळेकर, संदीप व्हनमाने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post