सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माननीय विशाल दादा पाटील यांच्या प्रचारार्थ आज मौजे नांद्रे, तालुका मिरज येथे श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नांद्रे येथे बैठकीस मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. यावेळी बोलताना जयश्रीवहिनी म्हणाल्या आमच्या घराण्यावर जो अन्याय झाला आहे, त्याला तुम्ही मतांच्या माध्यमातून विशाल दादांना निवडून देऊन झालेल्या अन्यायाचा बदला घेऊ. विशाल दादा यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आहे ते चिन्ह जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कसे पोहोचवता येईल हे बघावे. 7 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांचे मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी योग्य ते नियोजन करून मतदान करून घ्यावे. यावेळी ग्रामीण भागातून नांद्रे सारख्या मोठ्या गावातून विशाल दादांना जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे अशी विनंती केली.
यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय संग्राम दादा पाटील, मिरजेचे ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, ज्येष्ठ नेते एन एस (दादा) पाटील, सुरज मुल्ला, महावीर पाटील, महावीर भोरे, विष्णूंअण्णा पाटील खरेदी विक्री संघाचे व्हॉइस प्रेसिडेंट सचिन वाडकर, चौगुंडा पाटील गुरुजी, बाळगोंडा पाटील , राजगोंडा पाटील, मनोज पाटील, चंद्रकांत शेटे, अमित पाटील, प्रकाश चौधरी, लाजमभाई मुजावर तसेच नांद्रे गावातील विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन संचालक तसेच नांद्रे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सांगली प्रतिनिधी