महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रेत विशाल पाटील बनले पालखीचे भोई



सांगली : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२३ व्या जयंतीनिमित्त सांगली, कुपवाड आणि यशवंतनगर परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी सहभागी होत जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यशवंतनगर येथील शोभायात्रेत ते पालखीचे भोई बनले.
भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवानिमित्त सांगली शहरात जैन समाजाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत विशालदादा पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, यांच्यासह जैन बंधू भगिनी व सर्व जैन मंदिर ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते.
यशवंत नगर येथील राजमाने हाऊसिंग सोसायटीमध्ये जैन समाजाच्या वतीने निघालेल्या शोभायात्रेतील विशालदादा पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी विशालदादा पालखीचे भोई बनले होते. त्यांनी जैन मुनींचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत ऍड. अमोल चिमन्ना, अभिजीत चिमन्ना, सुकुमार खोत, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, विजय घाडगे, सुकुमार धरणगुत्ती, अनंत चिमड होते. यानंतर विशालदादा पाटील यांनी कुपवाड येथील शोभायात्रेत सहभाग घेत जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post