विशाल दादांसाठी मदनभाऊ पाटील युवा मंच मैदानात, वसंतदादा घराण्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढणार

सांगली प्रतिनिधी 

विशालदादा प्रकाशबापू पाटील यांच्या निवडणूक प्रचाराची माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची विष्णूंआणा भवन येथे श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार मिटिंग संपन्न झाली. या मीटिंगमध्ये विशालदादांच्या प्रचाराची व निवडणुकीची जबाबदारी घेऊन संपूर्ण ताकतीने काम करण्याचे ठरले आहे. मागील तीन वर्षापासून काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून विशाल दादा संपूर्ण जिल्हा ढवळून काढत असताना, पक्षाकडून उमेदवारी डावण्यात आली याचे पडसाद मीटिंगमध्ये उमटले. श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यातील सांगली शहर, मिरज शहर, अंकली, धामणी, बुधगाव, बिसूर, नांद्रे, खोतवाडी, हरिपूर, बामनोली, कुपवाड, जुनी धामणी, कर्नाळ, कावजी खोतवाडी, माधवनगर, कवठेमंकाळ या भागातून प्रमुख कार्यकर्त्यांची या मिटींगला उपस्थिती होती. सदर बैठकीमध्ये एक दिलाने एकमुखाने प्रत्येक कार्यकर्ता मीच विशालदादा मीच उमेदवार या भावनेतून काम करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्षांनी दिल्या. तसेच दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी विशाल दादांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ठीक 9.30 वाजता गणपती मंदिर, सांगली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ही केले. 
सदर मीटिंगमध्ये बुथनिहाय प्रचारा संदर्भात, भाजप विरोधातील रोष, भाजपच्या कुचकामी उमेदवारांबाबत, वसंतदादांच्या घरावर होणाऱ्या अन्यायाबाबत, येणाऱ्या विधानसभेबाबत अशा सर्वांगीण बाजूनी चर्चा करण्यात आली. अशा रीतीने युवा मंचाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज संपन्न झाली.

Post a Comment

Previous Post Next Post