सांगली प्रतिनिधी
विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार आकाश यल्लाप्पा पवार टोळीस संदीप घुगे, पोलीस
अधीक्षक, सांगली यांनी सांगली जिल्हयातुन १ वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे.
गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर सदरची हद्दपारीची
कारवाई करण्यात आलेली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख १) आकाश यल्लाप्पा पवार, वय ३२ वर्षे, रा. उत्तर शिवाजीनगर, माकडवाले कमानी जवळ, सांगली २) आकाश प्रकाश देवर्षी, वय २४ वर्षे, रा. न्यु रेल्वे स्टेशन वांगीकर प्लॉट, सांगली या टोळीविरुद्ध सन २०२४ मध्ये चार चाकी वाहनामधील बॅटरी चोरीचे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. नमुद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी, विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन विमला एम. चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर उपविभाग, सांगली यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा य सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावनी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख १) आकाश यल्लाप्पा पवार, वय ३२ वर्षे, रा. उत्तर शिवाजीनगर, माकडवाले कमानी जवळ, सांगली, २) आकाश प्रकाश देवर्षी, वय २४ वर्षे, रा. न्यु रेल्वे स्टेशन, वांगीकर प्लॉट, सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली जिल्हयातुन १ वर्ष कालावधीकरिता तडीपारी आदेश पारित केला आहे. आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबुत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाईमध्ये संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, यांचे मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. अ. शाखा, सांगली, प्रविणकुमार कांबळे, पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पो. ठाणे, पोहेकॉ अमोल ऐदाळे, बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली, तसेच संदीप साळुंखे, दौलत कोळी व महमद मुलाणी व उमेश कोळेकर, विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.