भारतीय जनता पार्टी सर्वात मोठ्या या पार्टीचे सदस्य व्हा.-नितीन राजे शिंदे

 भारतीय जनता पार्टीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी सदस्यता नोंदणी अभियान हाती घेतले आहे.
 या अनुषंगाने आज दि. 5-1-2025 रोजी भाजपा सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चाच्या वतीने श्री अविनाश मोहिते व श्री उदय मुळे यांनी मारुती चौक सांगली येथे भाजपा सदस्यता नोंदणी अभियान आयोजित केले होते.
 या अभियानास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
 या अभियानाचे उद्घाटन माजी आम. नितीन राजे शिंदे यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. यावेळी बोलताना नितीन राजे शिंदे म्हणाले भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून हिंदुत्वाच्या विचारसरणीत चालणारा कोट्यावधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक रचनेवर उभा असलेला हा पक्ष आहे.
 या पक्षामध्ये तरुणांना काम करण्याची फार मोठी संधी असून या भाजपा सदस्यता नोंदणी अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केली.
 याप्रसंगी बोलताना पै.पृथ्वीराज भैय्या पवार म्हणाले, भाजपा लोकशाही प्रणालीने चालणारी पार्टी असून दर तीन वर्षाला भाजपाचे सदस्यता नोंदणी अभियान होत असून यामध्ये काम करण्याची संधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळत राहते.सर्व पदाधिकाऱ्यांनी सदस्यता नोंदणी करावी.
 कामगार मोर्चा उपाध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले, भाजपा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील एक लाख बूथवर सध्या भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू असून आम. श्री सुधीर गाडगीळ यांचे नेतृत्वाखाली सांगली विधानसभा मतदारसंघात आज सर्व बुथवर मोठ्या प्रमाणात सदस्यता नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले आहे.
 याचा फायदा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत होणार असून त्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी यात सहभागी व्हावे.
 या अभियानास पै.पृथ्वीराज भैय्या पवार. उपाध्यक्ष,भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र,श्री प्रकाश तात्या बिर्जे, श्री हनुमंतराव पवार,जिल्हाध्यक्ष शिवप्रतिष्ठान,सदस्य भाजपा राष्ट्रीय कार्यकरणी,सौ मंजिरी ताई गाडगीळ,सौ.भारतीताई दिगडे, सुब्रावतात्या मद्रासी,अनिलभाऊ गडकरी, विजय दादा कडणे,सौ स्मिता पवार,सौ माधुरी वसंगडेकर,सौ रोहिणी उदय मुळे, विजय साळुंखे, विशाल पवार,चंद्रकांत सूर्यवंशी, रामचंद्र देशपांडे,आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.
 या भाजपा सदस्यता नोंदणी अभियानास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत सदस्यता नोंदणी करून घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post