लातूर ( विशेष प्रतिनिधी)
येथील सातकर्णी बौद्ध विहार च्या वतीने सातवी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. श्रीलंकेचे भंतेजी माजी खासदार अतुरलिए रतन महाथेरो
आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन आणि परिषदेचे अध्यक्ष भंते धम्मसेवक महाथेरो होते.
लातूर चे माजी लोकप्रिय खासदार संसद रत्न डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना नुकताच अमेरिकेच्या हार्वर्ड या विद्यापीठात भव्य अशा कार्यक्रमात इंटरनेशनल सोशल इम्पॅक्ट लिडर हा अति उच्च असा अवार्ड देऊन ३५ देशाच्या मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.भारतीय राजकारणी आणि समाजकारणी डॉ सुनील गायकवाड हे या पुरस्काराचे एकमेव भारतीय आहेत.
त्या बद्दल सातकर्णी बौद्ध परिषदेच्या वतीने त्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. औसा चे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते डॉ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास डॉ बाबाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एजुकेशन सोसाइटी चे माजी अध्यक्ष आणि सदस्य डॉ एस पी गायकवाड हे विशेष उपस्थित होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे,आमदार अभिमन्यू पवार, ॲड व्यंकट बेद्रे,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सातकर्णी ट्रस्ट चे अध्यक्ष भंते डॉ उपगुप्त थेरो, धम्म परिषदेचे संयोजक भंते पय्यानंद, भिक्खू संघ, आणि मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
Tags
लातूर प्रतिनिधी