सावळज ता. तासगाव येथील माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील (आबा) यांच्या सुरुवातीच्या काळापासून बरोबर असणारे निष्ठावंत मातब्बर नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरदादा उनउने , माजी सरपंच पांडुरंग भडके (मेहरबान) माजी सरपंच सुनील (दत्ता) केडगे, राजू काका पाटील, सिदगोडा पाटील, नागेश कुंभार, प्रफुल्ल पाटील, अभिजीत थोरात, राजेंद्र पाटील आदींनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केला.
किशोरदादा उनउने यांच्या अजित दादा गटातील प्रवेशाने रोहित पाटील गटाला धक्का बसला असून संजय काका पाटील गटाला मोठी ताकद मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बदललेल्या घडामोडीमुळे सावळज जिल्हा परिषद मतदार संघात त्यामुळे संजय काका पाटील यांना लीड मिळणार आहे. स्वर्गीय आबांना सुरुवातीपासून राजकारणात सावलीसारखे राहणारे किशोर दादा उणउणे यांच्या पक्ष बदलामुळे आबांच्या बरोबरीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची घुसमट बाहेर पडू लागली आहे.