कवठेमहांकाळ:बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ.शंकरदादा माने यांनी स्वाभिमानी उमेदवार व स्वाभिमानी विकास योजना जाहीर केली आहे.ही योजना गावच्या विकासाची असून विकास शंभर टके होणार असा विश्वास डॉ.माने यांनी व्यक्त केला आहे.याबाबत कोर्टातून नोटरी करून गावातील सरपंच,सदस्य व सुजाण नागरिकांपर्यंत कोर्ट नोटरी कागद पोहोचवला आहे.असे डॉ.माने म्हणाले.
थबडेवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथे आयोजित प्रचाराच्या छोटेखानी सभेमध्ये ते पुढे म्हणाले,
गावकऱ्यांनो जागे व्हा,आजपर्यंत प्रस्थापित आमदार,खासदारांनी तुमचा केवळ मतासाठी वापर केला.त्यांना आता हद्दपार करा. मतदारसंघातील तिसरा पर्याय म्हणून बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ.शंकर माने यांना हत्तीच्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.ज्या गावचे मतदार डॉ.माने यांना ७० टक्के पेक्षा जास्त मतदान करतील,ते गाव दत्तक घेतले जाणार आहे.त्या गावासाठी पाच वर्ष प्रत्येक व्यक्तीला मदत केली जाणार आहे.त्यामध्ये सात लाख रुपयेपर्यंत खर्चाचे मोफत उपचार दिले जातील,प्रत्येक कुटुंबाला घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये दिले जातील,प्रत्येक विद्यार्थ्याचां सर्व शैक्षणिक खर्च उचलला जाईल ,मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये,मुलाच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये,प्रत्येक घरात संसार सट,अंत्यविधीसाठी वीस हजार रुपये मदत यासह
गावातील साठ वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक यांना तीन हजार रुपये पेन्शन,त्या गावांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी शंभर कोटीचा कारखाना उभा करून त्या गावातील शंभर टक्के मुला मुलींच्या हाताला काम दिले जाईल. ही केवळ आश्वासने नसून तुम्हाला कोर्टा मार्फत करार नोटरी करून देत आहे,मतदारांनी जीवनातील एक मतदान करा,प्रत्येकाने ग्रामपंचायत मध्ये विविध योजना बाबत माहिती घेऊ शकता,नोटीस बोर्ड व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हे करार पेपर नोटरी दिली आहे.मतदारांनो जागे व्हा,प्रस्थापितानी गरिबाचां वापर करून शोषण केले आहे.या मतदारसंघातील कार्यसम्राट,संघर्ष नायक डॉ.शंकरदादा माने यांच्या हत्ती
चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा,एक वेळ मतदान देऊन अधिक काम करण्याची संधी द्या,प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा,असे आवाहन ही माने यांनी यावेळी केले आहे.
Tags
कवठेमंकाळ प्रतिनिधी