सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांना सांगली शहरातून दलित महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी संविधानाला विरोध करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याचा इशारा दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दिला.
दलित महासंघाचे सतीश मोहिते, सुषमाताई मोहिते विनोद वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज जयश्रीताई मदन पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. या पाठिंबाबद्दल जयश्रीताई पाटील यांनी दलित महासंघाचे आभार मानले.
जयश्री पाटील म्हणाले की, मदन भाऊ ने मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी मोठे काम केले आहे. मागासवर्गीय महिलेला महापौर पदाची संधी ही मदन भाऊंनी दिले. आम्ही सदैव मागासवर्गीय समाजाच्या पाठीशी राहिलो आहे. यापुढे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
सतीश मोहिते म्हणाले की गेली 35 वर्षात दलित महासंघ एक आंबेडकर चळवळ म्हणून नावारूपाला आली. संविधानाला विरोध करणाऱ्या भाजपला काहींनी पाठिंबा दिला आहे. पण आम्ही सांगली विधानसभा मतदारसंघात नेत्यांचा आदेश डावलून जयश्री पाटील यांना पाठिंबा देत आहे कारण भाजपचा पाडाव करणारा सक्षम उमेदवार म्हणून जयश्री पाटील ह्याच आहेत . तसेच स्व.मदन भाऊंना दिलेली आदरांजली म्हणून जाहीर पाठिंबा देत आहोत. त्यांनी समाजाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न केले आहे. दलित महासंघाचे कार्यकर्ते जयश्री पाटील यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करतील.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आतापर्यंत आमच्या समाजाचा मतासाठी भाजपने वापर करून घेतला आहे. त्यांना या निवडणुकीत धडा शिकवू, अशी ग्वाही दिली. यावेळी जयश्री पाटील यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा निर्धार दलित महासंघाच्या वतीने केला आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी