सांगलीवाडीचा पक्का निर्धार
सांगली दि.१७: महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा पक्का निर्धार केल्याचे आजच्या पदयात्रेतून स्पष्ट झाले. आज गावच्या राममंदिरात नारळ फोडून पदयात्रा सुरु झाली.. महाआघाडीचे झेंडे नाचवत, पृथ्वीराजबाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत पदयात्रा जुना जकात नाका -झाशी काॅलनी - राणा प्रताप चौक - झेंडा चौक - आरवाडे प्लॉट - म्हसोबा गल्ली - धनगर गल्ली - कुंभार गल्ली - विठ्ठल मंदिर - चावडी परिसर - मोहीते गल्ली ते राममंदिर येथे समारोप झाला.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'सांगलीवाडी जे ठरवते ते सांगलीत घडते. महापूर काळात सांगलीवाडी करांची सेवा करायला मिळाली. सांगलीवाडीच्या चौफेर विकासासाठी हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या. पाच वर्षे तुमच्यासाठी राबलोय. पुन्हा पाच वर्षे आमदार म्हणून द्या.