कवठेमंकाळ प्रतिनिधी
आजही ग्रामीण भागात मुला-मुलींच्या शिक्षणामध्ये मुलांना प्राधान्य दिले जाते त्यामुळे अनेक वेळा मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते मात्र महाराष्ट्रातील महायुती सरकारने मोफत उच्च शिक्षणाची सोय केल्यामुळे मुलींचे शिक्षण सोपे झाले आहे. लोकोपयोगी निर्णय घेणाऱ्या महायुती सरकारच्या पाठीमागे लोक ठामपणे उभे राहतील, व तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातून संजय काका मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास शिवानी ताई प्रभाकर बाबा पाटील यांनी व्यक्त केला
तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचे महायुतीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ कवठेमंकाळ तालुक्यातील कोगनोळी धुळगाव यासह ग्रामीण भागात आयोजित पदयात्रेत दरम्यान महिलांशी संवाद साधताना शिवानी ताई पाटील बोलत होत्या.
यावेळी बोलताना शिवानी ताई पाटील म्हणाल्या , महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसारखी योजना राबवून महिलांना दरमहा दीड हजार रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये दिले आहेत. पुढील काळात 2100 रुपये देण्याचे सरकारने वचन दिले आहे म्हणजेच महिलांना दरवर्षी 25 हजार रुपये या योजनेद्वारे मिळतील. एसटी प्रवासात तिकिटात निम्मी सवलत दिल्यामुळे महिलांचा प्रवास आणखी सोपा झाला आहे. यापुढील काळातही माहिती सरकारकडून महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाणार आहेत
तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात केवळ भावनिकेचे राजकारण सध्या सुरू आहे. गेली 35 वर्ष ज्यांच्या घरामध्ये आमदारकी आहे ते विकास कामावर, मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने भविष्याच्या योजनांवर न बोलता लोकांसमोर खोटे बोलून मते मागली जात आहेत. त्यामुळे जनतेने अशा लोकांना ओळखावे व गेल्या दहा वर्षाच्या काळात विकासाचा डोंगर उभा करणाऱ्या संजय काकांच्या पाठीशी राहावे असे आवाहन ही यावेळी शिवानी ताई पाटील यांनी केले
शिवानी ताई प्रभाकर बाबा पाटील यांच्या प्रचार दौरा व पदयात्रेस महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. शिवनीताई पाटील यांनी आपुलकीने यावेळी सर्व माता-भगिनींशी संवाद साधला
Tags
सांगली प्रतिनिधी