टाकवे (ता. शिराळा) येथील भैरवनाथ सेवा सोसायटी संचालक सीताराम चंद्राप्पा मोहिते, ग्रामपंचायत सदस्य विद्या नानासो बनसोडे यांच्यासह सचिन तुकाराम रावते, ओंकार राजेंद्र माने, ओमकार नानासो बनसोडे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत व सत्कार महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे उमेदवार, आमदार मानसिंगराव नाईक, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक व तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक यांनी केले. यावेळी जे. बी. पाटील (सर), बाजार समितीचे उपसभापती विजय महाडीक व गावातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
शिराळा प्रतिनिधी