शिराळा (प्रतिनिधी) : विरोधक भूलथापा मारून, मतदारांची फसगत करू पाहताहेत पण शिराळा मतदार संघातील जनता त्याला न फसता विकासाच्या बाजूने राहून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वास आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला.
कणदूर पुनवत, खवरेवाडी, शिराळे खुर्द, फुपेरे (ता. शिराळा) येथील महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी संवाद साधला त्यावेळी बोलत होते. प्रचितीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक प्रमुख उपस्थित होते.
आमदार श्री. नाईक म्हणाले, विरोधकांकडून खोट्या प्रचाराचा बनाव सुरू आहे. मात्र त्यांनाही त्याच भाषेत उत्तर मिळणार आहे. कामातून कर्तृत्व उभा राहते. मला विरोधकांप्रमाणे फक्त निवडणुकीत जनतेचा पुळका येत नाही. लोकसेवेचा वसा, वारसा जपण्यात मी कायम पुढे आहे. सत्ता असो वा नसो पण जनसेवेचा वारसा मी कायम ठेवला आहे. मी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे तुमच्या समोर आहेत. विकास झाला अथवा केला असेल तर, मला मतदान करावे. विकास आणखी गतिमान करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटीलसाहेब व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईकसाहेब यांची खंबीर साथ आहे. या विधानसभा निवडणुकीत माझे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस आहे, हे मतदारांना आवर्जून सांगा.
यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, विरोधकांनी कितीही भूलथापा मारल्या तरी ते जनतेची फसगत करू शकणार नाहीत. कामाचा माणूस म्हणून मानसिंगभाऊंकडे संपूर्ण मतदार संघ, जिल्हा पाहतो. त्यांनी ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समूहाच्या माध्यमातून साधलेली प्रगती मोठी आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून शेतकरी, महिला हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. शिराळा मतदार संघात विकासकामे राबविताना प्रत्येक गावात निधी दिला आहे. म्हणून त्यांना पुन्हा आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेवर निवडून द्यायचे आहे. कार्यकर्त्यांनी मानसिंगभाऊंनी केलेले कामे घराघरात पोचवा.
कणदूर येथे दूध संघाचे संचालक मानसिंग पाटील, शिवाजी पाटील, रघुनाथ पाटील, आनंदा, संजय, विष्णू, बाबासो, शिवाजी, पी. डी., प्रवीण, भगवान, दिलीप, वसंत, विश्वास विलास पाटील, संग्राम कदम, रामचंद्र भोळे, रामदास गुरव, आबासो खांडेकर, संजय व विठ्ठल शिंदे, राजेंद्र कांबळे, पुनवत येथे विश्वासचे संचालक बिरुदेव आमरे, रघुनाथ माने-आंदळकर, माजी सरपंच अमर माने, पांडुरंग पाटील, जालिंदर शेळके, बबन पाटील, अशोक शेळके, सदाशिव आंदळकर, बजरंग शेळके, फुपेरे येथे सरपंच शोभा गायकवाड, उपसरपंच दादासो गायकवाड, अण्णासो गायकवाड, मारुती गायकवाड, आनंदराव, उत्तम व सर्जेराव गायकवाड, रामचंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, सर्जेराव गायकवाड, स्वप्नील, मानसिंग व राजाराम पाटील, प्रकाश, बाजीराव, शिवाजी व प्रतीक गायकवाड, शिराळे खुर्द येथे जे. के. पाटील, तानाजी पाटील, के. आर पाटील, माजी सरपंच दत्ता आंदळकर व किरण पाटील, मा. सरपंच पांडुरंग पाटील, बजरंग, आनंदराव, रंगराव, दगडू व लक्ष्मण पाटील, खवरेवाडी येथे सत्यवान खवरे, नामदेव, महादेव, सुनील व सर्जेराव खवरे, लक्ष्मण, राजाराम व डॉ. अनिल खोत, बाबासो गायकवाड आदी मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.