सांगली, दि.३०: येथील गाव भागातील समर्थ व्यायाम शाळेस आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज सकाळी भेट दिली. व्यायाम शाळेतील श्री हनुमंताच्या मूर्तीसमोर त्यांनी नारळ फोडला आणि वंदन केले. यावेळी सर्वांनी 'भीमरूपी महारुद्रा' हे स्तोत्र म्हटले.
यावेळी गुरुनाथ कुलकर्णी, रमेश गोवंडे, इनायत तेरदाळकर , माईणकर, विजय कुंभार, विजय साळुंखे, शुभम चव्हाण, भालचंद्र चितळे आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित व्यायामपटूबरोबर सुधीरदादांनी चर्चा केली.
Tags
सांगली प्रतिनिधी