सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी विविध विभागाच्या वीस समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सुधीरदादा गाडगीळ म्हणजेच आपण सर्व उमेदवार आहोत असे समजून प्रचारयंत्रणा राबवा असे आवाहन भाजपाचे किसान सभेचे प्रदेशउपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केले. तर गाफील राहू नका,विजयश्री आपलीच आहे असे सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांनी केले.
काल भाजपाच्या गाडगीळ यांच्या पक्षाच्या संपर्क कार्यालयात विविध समित्यांची बैठक आमदार सुधीर गाडगीळ,यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पक्षाचे प्रभारी अभय पाटील, सहप्रभारी श्रीमती सरदेसाई ,नीता केळकर, गौतम पवार, भाजपाचे शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांनी मार्गदर्शन केले. भाजपाने सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी जाहिर केल्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. पक्ष कार्यालयात कार्यकर्त्याची लगबग सुरु झाली आहे. यावेळी प्रकाशतात्या बिरजे, अविनाश मोहिते,प्रविण कुलकर्णी,अभिजित मिरासदार,धिरज सुर्यवंशी, अतुल माने आदी उपस्थित होते.
उमेदवार सुधीर गाडगीळ म्हणाले, कार्यकर्त्याच्या ताकदीवरच सांगली विधानसभा मतदारसंघात दहा वर्षात कोट्यावधीची विकास कामे केली आहेत,अजूनही काही कामे राहिली आहेत.महायुतीच्या योजना मतदारापर्यत पोहोचवा, गाफील राहू नका,विजयश्री आपलीच आहे.
यावेळी पदयात्रा,जाहिर सभा,यासह अन्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. जाहिर सभांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,चिराग पासवान, यासह अनेक मान्यवरांच्या जाहिर सभांचे नियोजन करण्यात येत आहे.
Tags
सांगली प्रतिनिधी