जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर दक्षिण श्री. रावसाहेब पाटील यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड

सांगली : महाराष्ट्रामध्ये जैन समाज हा सधन दिसत असला तरी या समाजाच्या सामाजिक, विद्यार्थी
उद्योजक, शैक्षणिक संस्था, सामाजिक, धार्मिक संस्था यांच्या समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचे
निराकरण होण्यासाठी जैन समाजाला शासन दरबारी योग्य प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणी होत होती. त्याचा
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगारमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे व आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी
पाठपुरावा केला होता.
जैन समाजाची सद्यस्थिती व त्यांना जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर प्रतिनिधीत्व
मिळण्यासाठी वरीष्ठ आणि प्रशासकीय पातळीवर केलेल्या प्रयत्नाना यश आले आणि त्याबाबत शासनाच्या निवडी
जाहीर झाल्या. त्यामध्ये दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या
जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
त्याबाबतचा शासन निर्णय सचिवांनी काढला आहे.
या निवडीबाबत जैन समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबाबतच्या शासन निर्णयाचे पत्र ना.
सुधीरभाऊ खाडे व आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी स्वतः येऊन श्री. रावसाहेब पाटील यांना दिले व त्यांचा
सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी या दोघांनीही श्री. रावसाहेब पाटील यांची या पदासाठी
योग्य निवड असून ते आमच्या पाठीमागे लागुन समाजाचे प्रश्न सोडवून घेतील कारण त्यांना विविध समित्यामध्ये
काम करण्याचा मोठा अनुभव आहे अशी भावना व्यक्त केली.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post