बदलापूर बलात्कारातील आरोपीस फाशी द्या -लोकहित मंच व त्रिकोणी बाग हास्य क्लबची मागणी

सांगली प्रतिनिधी
                  बदलापूर मधील आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन तीन ते चार वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या त्याच शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला जलद न्यायालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर फाशी द्यावी ,कायद्यामध्ये दहशत आहे परंतु ती लवकरात लवकर अमलात आणावी अशी मागणी, त्रिकोणी बाग हास्य क्लब मधील उज्वला गुळवणी व महिला सदस्यांनी व लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे.
           आज सकाळी आठ वाजता या हास्य क्लबच्या उज्वला गुळवणी व महिला सदस्यांनी व मनोज भिसे यांनी त्रिकोणी बागेत सदर घटनेचा निषेध करत आरोपीच्या फाशीची मागणी केली.यावेळी उज्वला गुळवणी, ज्योती चव्हाण,अरुणा भगत,वसला चव्हाण,लक्ष्मी गाडे, सुनंदा चव्हाण, प्रतिभा पाटील, शरीन मुल्ला,शालन पाटील, संगीता कुलकर्णी, आक्का पाटील, मंगल शिराळे, परवीन बेग, दाक्षायणी स्वामी, शालन मोहिते, अंजना नागनूरकर,व लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post