आठ ऑगस्टला सांगली शहरामध्ये मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीमध्ये सांगली जिल्ह्यातून आलेल्या लाखो मराठा बांधव यांची गैरसोय होऊ नये म्हणून व सामाजिक भावनेच्या प्रेरणेतून चहा,नाश्ता,पाण्याची मोफत व्यवस्था विश्रामबाग चौक, पुष्पराज चौक,राम मंदिर कॉर्नर, सांगली या ठिकाणी मराठा स्वराज्य संघ व केमिस्ट्री,ड्रगिष्ट असोसिएशन यांच्या वतीने सर्वांची मोफत अल्पवहाराची व्यवस्था केली होती,त्याबद्दल राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल श्री लक्ष्मीनारायण फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष माननीय रमेश अण्णा चव्हाण,उपाध्यक्ष चंद्रकांत मालवणकर,सेक्रेटरी सुधाकर नार्वेकर यांच्या हस्ते राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांचा सत्कार करण्यात आला.या वेळेला प्रभारी अध्यक्ष गजानन पोतदार,विजय देसाई,सचिव अमित देसाई,सुशांत नार्वेकर,विजय कल्याणकर, शंकरराव मोहिते,रणजीत चव्हाण कपिल मालवणकर, संभाजी पाटील व इतर अनेक जण उपस्थित होते.या वेळेला सर्वांनी टाळ्या वाजवून राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की सामाजिक कार्यामध्ये भविष्य काळातील सांगलीतील आघाडीवर असणारी लक्ष्मीनारायण फाऊंडेशनच्या वतीने माझा सत्कार केला त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रमेश अण्णा चव्हाण उपाध्यक्ष,सचिव,व सर्व संचालकांचे आभार मानतो व आपली संस्था भविष्यात सामाजिक कार्यात अग्रेसर राहील अशा शुभेच्छा देतो.
Tags
सांगली प्रतिनिधी