सांगलीत महापूर सदृश्य निर्माण झालेल्या परिस्थितत मदत कार्यासाठी युवा मंच याची फौज तयार

 




माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने सांगलीतील पूर बाधित भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी, त्याचबरोबर त्यांचे सामान बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू आहे. काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीवहिनी मदन पाटील यांच्या सूचनेनुसार सांगली पुराचे पाणी आलेल्या भागात युवा मंचच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. सूर्यवंशी प्लॉट, काका नगर, मगरमच कॉलनी आदी भागातील लोकांना बाहेर काढत तसेच त्यांचे घरगुती सामानही बाहेर काढण्यासाठी टेम्पो, छोटा हत्ती आदि वाहनांच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर युवा मंच्याची  टीम राबत आहे. युवा मंचच्या या कामाचे परिसरातील नागरिकांच्या कडून मोठे कौतुक होत आहे.


या टीम मध्ये मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, शितल लोंढे, अमित लाळगे, प्रवीण निकम, अमोल झांबरे, शमाकांत अवटी, दिनेश सादिगले, ज्ञानेश्वर पाटील, सचिन पाटील,  राहुल मोरे, नितीन भगत, मयुरेश भिसे आधी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post