सर्वच घटकांना ‘अच्छे दिन’ - सुधीर दादा गाडगीळ

यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा ऐतिहासिक आहे. महायुतीने सर्वच घटकांना भरभरून दिले आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ तर महिलांचा आत्मसन्मान
वाढवणारी आहे. आर्थिक स्वावलंबनाबरोबरच नारीशक्तीच्या वैविध्यपूर्ण गुणांना वाव मिळण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाने २ हजार कोटी इतकी भरभक्कम तरतूद करण्यात आल्याने आता शिक्षण पूर्णपणे निशुल्क असेल. पात्र कुटुंबाला वर्षाला ३
गॅस सिलिंडर मोफत देऊन महिलांच्या घरखर्चाला हातभार लावला आहे. तसेच शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकित वीजबिल माफ, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत, गाय दूध उत्पादकांना ५ रुपये अनुदान, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा असे निर्णय घेणारा हा अभूतपूर्व अर्थसंकल्प आहे. प्रतिदिंडी २० हजार रुपये निधी देऊन शासनाने भक्ती-शक्तीचा गौरव केला आहे. सर्वसामान्यांसह शेतकरी, महिला, कष्टकरी, कामगार, युवकांना न्याय देणारा हा नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे. जिल्ह्यातील म्हैसाळ या ठिकाणी सौरउर्जा प्रकल्पाची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे हा मोठा प्रकल्पही लवकरच पूर्ण होईल.
- आमदार सुधीर गाडगीळ, सांगली.
-

Post a Comment

Previous Post Next Post