अजब महापालिका गजब कारभार - आनंद लेंगरे

 

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अजब कारभार कुठलीही पूर्व सूचना कल्पना न देता किंवा कुठलीही पूर्वी तयारी न करता ऑनलाइन मिळणारे जन्म व मृत्यू दाखल्याचे पोर्टल माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे. सध्या जून महिना असल्याने शालेय शिक्षण, ऍडमिशन साठी लोकांना दाखल्यासाठी या ऑनलाइन पोर्टलचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. परंतु हे पोर्टल बंद केल्यामुळे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी लोकांना दाखले लवकरात लवकर मिळावे यासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावे, अन्यथा माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.अशी माहिती जिल्हा अध्यक्ष आनंद लेंगरे यांनी दिली


Post a Comment

Previous Post Next Post