माननीय मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्या वतीने प्रचाराचा झंजावात

सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माननीय विशालदादा प्रकाशबापू पाटील यांचे प्रचारार्थ माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने शहरात व ग्रामीण भागात कॉर्नर सभा घेत प्रचाराचा झंजावात कायम ठेवला आहे. माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने आत्तापर्यंत 15 ते 16 ठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन करून भागाभागात वातावरण निर्मिती केली आहे. सदर कॉर्नर सभेंना लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिळणारा प्रतिसाद पाहता विशालदादा हे 100% निवडून येतील व खासदार होतील यात तीळ मात्र शंका नाही असे मत यावेळी मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी मांडले.
सदर कॉर्नर सभेसाठी अविनाश जाधव, अड. भाऊसाहेब पवार, रत्नाकर नांगरे, मयूर बांगर, अमोल झांबरे, संजय शिकलगार आदी पदाधिकारी व युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post