सांगली प्रतिनिधी : चेट्रीचंद संत भगवान श्री झुलेलाल महाराज जयंती शामरानगर येथील समस्त सिंधी समाज सांस्कृतिक भवनमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते केक कापून साजरी करण्यात आली.
यावेळी सिंधी समाज अध्यक्ष नंदलाल कुंदनानी, उपाध्यक्ष शिवकुमार जुमराणी, सदस्य जयराम शेठ कुकरेजा, गोपीचंद गिडवानी, लालचंद धनवानी, अर्जुनदास शंभवानी यांच्या सह माजी नगरसेवक विक्रम सावर्डेकर, मराठा समाजाचे अध्यक्ष अभिजित पाटील उपस्थित होते.
सिंधी समाजाच्या वतीने आज चेट्रीचंद संत भगवान श्री झुलेलाल जयंती साजरी करण्यात आली. सिंधी समाजाच्या वतीने जुलूस म्हणजे प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमात खासदार संजयकाका पाटील यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
यावेळी बोलताना, संजयकाका पाटील म्हणाले, सिंधी समाज नेहमीच आमच्या बरोबर राहिला आहे. आणि आम्ही सनातन धर्माचा आदर करतो.
सिंधी समाजातील प्रमुख मंडळींनी संजयकाका पाटील यांना साथ देण्याचा शब्द दिला.
Tags
सांगली प्रतिनिधी