विनायकनगर सांगली येथे हनुमान जयंती उत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी उत्साहात पार पडला तर ३० एप्रिल रोजी प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांचे किर्तन संजीवनी हनुमान मंदीरासमोर आयोजीत केले आहे .
दर वर्षीप्रमाणे या वर्षीही संजिवनी हनुमान सेवाभावी संस्था विनायकनगर, सांगली यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला ;
यावेळी दि17 एप्रिल रोजी श्री राम जन्मोत्सव सोहळा मोठया प्रमाणात साजरा करणेत आला. त्याचप्रमाणे दि 17/4/24 ते 23/4/24 अखेर प्रत्येक दिवशी सकाळी ८ ते दुपारी अकरा पर्यंत श्री ज्ञानेश्वर माऊलीचे पारायण करण्यात आले व सायंकाळी 5 ते 7 पर्यंत विविध भजनी मंडळामार्फत भजनाचे कार्यक्रम करण्यात आले होते. तसेच ह.भ.प अवधुत मिरजकर सांगलीवाडी यांच्या किर्तनाचा कार्यक्रम करणेत आला. सायंकाळी 6 वाजता महाआरती नंतर सहा हजार लोकांच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच दि. 22/ एप्रिल रोजी सवलतीच्या दरात रक्त चाचणी कॅम्प Tyrocare Miraj यांच्या सौजन्याने पार पडला. 24 एप्रिल रोजी अरिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले याचा 60जणांनी लाभ घेतला या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह नागरिकांचीही प्रचंड गर्दी होती या सर्व कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन नगरसेवक विष्णू माने संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष-गजानन कोळेकर, सचिव प्रकाश पाटील, संभाजीराव जाधव, शिवाजीराव कुणेगावकर दत्तात्रय गुरव, जालिंदर फारणे, वाड, सुरेश शितोळे, नाना गायकवाड, कमलाकर बने, वि शिलालकर, एस एस जाधव, दिलिप बाबर, भगवान कांबळे, सुरेश काटकर, अमर पाटील, भरत माने, शोभा भोरकडे, संगिता दोडमणी, राजाराम निलवे, तुकाराम गडदे भगवान कांबळे यांनी केले होते .
Tags
सांगली प्रतिनिधी