कुपवाड शहरातील रेकॉर्डवरील सचिन चव्हाण या गुंडाचा थरारक पाठलाग करुन उडगाव येथे खून

सांगली प्रतिनिधी
कुपवाड शहरातील रेकॉर्डवरील सचिन चव्हाण या गुंडाचा सांगलीतून थरारक पाठलाग करत डोक्यात, छातीवर, हातावर धारदार हत्याराने वार करत निर्घुणपने खून करण्यात आला. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या चौघाना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुपवाडचा यातील मृत आणि हल्लेखोरांची नावे अद्याप स्पष्ट झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. एक तरुण बुलेटवरुन जयसिंगपूरच्या दिशेने निघाला होता.
सांगलीपासून काही तरुण त्याचा पाठलाग करत होते. उदगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर आल्यावर मृत सचिन चव्हाण या तरुणाला काहीजनपाठलाग करत असल्याचे लक्षात आले.त्यानंतर तो बुलेट रस्त्यावर सोडून एका फैब्रिकेशनच्या दुकानात शिरून लपून बसला.पाठलाग करणाऱ्या तरुणानी त्याला शोधून ओढ़त रस्त्यावर आणले. तेथे त्याच्यावर धारदार हत्यारानी सपासप वार केले. है हल्ला इतका भीषण होता की, मृताच्या हाताची बोटे तुटून पडली. तो तरुण मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर हलेखोर जयसिंगपूरच्या दिशेने
पळून गेले. घटना पाहणाऱ्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली.जयसिंगपूरचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके
यांच्या मार्गदर्शनाने रोहित डावाळे, अमोल अवघडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी संशयित चौघाना ताब्यात घेतलेआहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post