निशिकांतदादा लाडकी बहीण आरोग्य योजना" महिलांसाठी नवसंजीवनी व मोठा आधार

डॉ.भूपाल गिरीगोसावी : ३ हजार २०० महिला रुग्णांनी घेतला योजनेचा लाभ

इस्लामपूर : प्रतिनिधी
   भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटरतर्फे वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या "निशिकांतदादा लाडकी बहीण आरोग्य योजनेचा अवघ्या दीड महिन्यात ३ हजार २०० महिला रुग्णांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही योजना महिलांसाठी नवसंजीवनी व मोठा आधार ठरली आहे, अशी माहिती प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूपाल गिरीगोसावी यांनी माध्यमांशी दिली.

डॉ.भूपाल गिरीगोसावी म्हणाले, या धावपळीच्या युगात महिलांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पैशाअभावी अनेक महिलांना उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे या माता-भगिनी शारिरीक दृष्ट्या निरोगी व सक्षम रहाव्यात, त्यांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहावे, या हेतूने भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटरतर्फे वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी आम्ही "निशिकांतदादा लाडकी बहीण आरोग्य योजना" १९ ऑगस्ट २०२४ सुरू केली होती. अवघ्या दीड महिन्यात या योजनेच्या लाभासाठी ६ हजार २२६ महिलांनी नांव नोंदणी केली आहे तर ३ हजार २०० महिलांनी या योजनेचा लाभ घेत प्राथमिक उपचार घेतले आहेत. आजअखेर ७०० महिला रुग्णांवर विविध शत्रक्रिया, तपासणी, औषधोपचार अगदी मोफत करण्यात आले आहेत. योजनेसाठी महिलांना कोणतीही वयाची अट नाही. तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.निशिकांतदादा लाडकी बहिण आरोग्य योजनेमुळे महीला वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे,या योजनेच्या माध्यमातुन सर्व तपासण्या, शस्त्रक्रीया, औषध, उपचार पुर्णत: मोफत होत असल्याने या कुटुंबाचा अर्थिक ताण पुर्णत: कमी झाला आहे,यामुळे रुग्ण व कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.अनेक महीला या योजनेमुळे निशिकांदादा व डाॅक्टर्स,नर्स व इतर स्टाफ यांचे आभार मानत आहेत.

यावेळी प्रकाश शिक्षण मंडळ व कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील, एल.आर.पी.आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभिमन्यू पाटील, डॉ.प्रसन्न गवळी, डॉ.संजय पाटील, रणजित पाटील, रणधीर फार्णे, रोहन जाधव, रोहन मोरे, विश्वजीत पाटील उपस्थित होते.


 महिलांवर होतात मोफत उपचार
       निशिकांतदादा लाडकी बहीण आरोग्य योजनेअंतर्गत वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महिलांना सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, हॉस्पिटलमधील औषधोपचार, सोनोग्राफी, ईसीजी, एक्सरे, सी.टी.स्कॅन, एम.आर.आय, अँजिओग्राफी, मूलभूत रक्तचाचण्या, नॉर्मल डिलीव्हरी व सिझेरिअन आदी सुविधांचा मोफत लाभ मिळत आहे. तरी या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

रुग्णांना मोफत आहार
निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या संकल्पनेतुन प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधील ॲडमिट रुग्णांना सकस आहार मोफत दिला जातो,सकाळी नाष्टा,दोन वेळचे जेवण असा आहार दिला जात असल्याने नातेवाईक यांची होणारी धावपळ होत नाही व वेळ आणि पैसा ही वाचत आहे व रुग्णांना वेळेत आहार मिळत आहे,याही उपक्रमाचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post